प्रपोज करताय? तर जाणून घ्या ‘या’ खास टिप्स

प्रपोज डे हा दिवस व्हॅलेंटाईनच्या आठवड्यातील दुसरा महत्वाचा दिवस आहे.

प्रपोज करत असाल तर अति घाई करू नका. संयम ठेवा. आधी त्या व्यक्तीला तुमच्याबद्दल काय वाटतं ते जाणून घ्या.

प्रपोज करायच्या आधी तुमच्या प्रिय व्यक्तीच्या आवडीनिवडींबाबत जाणून घ्या.

त्या व्यक्तीच्या आयुष्यात कोणी आहे का हे आधी जाणून घ्या.

कोणतंही नातं वेळेनुसार जास्त घट्ट आणि मजबूत होत जातं. त्यामुळे प्रेम व्यक्त करताना उताविळपणे करू नका

तुम्ही ज्या व्यक्तीला प्रपोज करणार आहात ती व्यक्ती तुमच्यासाठी खूप स्पेशल आहे याची जाणीव करून द्या.

पार्टनरच्या फ्रेन्ड्ससोबत मैत्री वाढवण्याचा प्रयत्न करा. त्याच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

जेव्हा तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज कराल तेव्हा इतर कोणत्याही व्यक्तीचा समावेश दोघांमध्ये करू नका. कारण त्यामुळे तुमची इमेज खराब होऊ शकते.

प्रपोज करायला जाताना रॅन्डम कपडे न घालता तुमची पर्सनॅलिटी चांगली दिसेल असे कपडे घाला.

Leave A Reply

Your email address will not be published.