हरतालिका तृतीयेचंं व्रत कसं आणि कधी कराल

श्री गणरायाचे आगमन होण्याआधी भाद्रपद तृतीयेला हरितालिकेचे पूजन करण्याची परंपरा आहे.

हरितालिकेच्या व्रतात शिव-पार्वतीचे पूजन केले जाते. कुमारिका आणि महिला या दिवशी व्रत करतात.

हरतालिका पुजा मुहुर्त आणि तिथी

 • हरतालिका तिथी: 21 ऑगस्ट 2020
 • हरतालिका तिथी प्रारंंभ: 21 ऑगस्ट दुपारी 02.14 वाजता
 • हरतालिका तिथी समाप्ती: 21 ऑगस्ट रात्री 11.04 PM पर्यंत.
 • दरम्यान संंध्याकाळी 6 ते 9 यावेळेत प्रदोष काळ असणार आहे.

हरितालिका पूजाविधी

 • या दिवशी अंगाला तेल लावून स्नान करावे. स्नान केल्यानंतर स्वच्छा जागी चौरंग ठेवुन भोवती रांगोळी काढावी.
 • चौरंगावर वाळू आणून पार्वती आणि सखीसह शिवलिंग स्थापित करावे.
 • उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावरील सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडावा.
 • समोर पाच विडे मांडून तेथे सुपारी, खारीक, बदाम, नाणे, फळ ठेवावे.
 • सर्वप्रथम स्वत:ला हळद कुंकु लावून देवासमोर विडे ठेवावे.
 • अक्षता, हळद कुंकु वाहून मनोभावे नमस्कार करावा.
 • सर्वप्रथम गपपतीची आणि नंतर महादेव व सखी-पार्वतीची षोडशोपचारे पूजा करावी.
 • पूजा केल्यावर धूप-दीप, नैवेद्य दाखवून पत्री वाहावी.
Leave a comment