दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना
ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील बेरोजगार युवक / युवतींना प्रशिक्षण देऊन रोजगाराची उपलब्धता करून देण्यासाठी ही योजना राबविली जाते.
लाभाचा तपशील
ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील बेरोजगार युवक / युवतींना प्रशिक्षण देऊन रोजगाराची उपलब्धता निर्माण करून मिळेल व त्यांना कौशल्य विकासासाठी निवासी प्रशिक्षण देण्यात येईल
📝 आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड,
- जात प्रमाणपत्र,
- बचत गट प्रमुखाचे प्रमाणपत्र अथवा बचत गटाच्या बँक पासबुकची प्रत,
- मनरेगा जॉब कार्ड,
- वयाचा दाखला,
- शिधापत्रिका
संपर्क साधा : सर्व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालये
🖥 सविस्तर माहितीसाठी भेट द्या : http://ddugky.gov.in/