आता Whatsapp वर एकदा पाहिलेला मेसेज ऑटो होणार डिलिट, नवं फिचर लाँच

इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशन व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या युजर्ससाठी View Once हे नवं फिचर लाँच केलं आहे.

या फीचर अंतर्गत, कोणताही व्हिडिओ किंवा फोटो युजर्स View Once मोड अंतर्गत पाठवू शकतात.

या मोडद्वारे पाठवलेले कोणतेही फोटो आणि व्हिडिओ फक्त एकदाच शेअर केले जाऊ शकतात.

एकदा फोटो ओपन केल्यानंतर, युजर्स तो पुन्हा पाहू शकणार नाहीत आणि ते इतरांना शेअर करू शकणार नाहीत.

यासंदर्भात कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे.

तुम्हाला हे फिचर वापरायचे असेल तर तुम्हाला तुमचे व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करावे लागणार आहे.

यासाठी तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ते अपडेट करू शकतात. या नवीन फीचरसह, इन-अ‍ॅप मेसेज नोटिफीकेशनची स्टाईलदेखील बदलली आहे.

जेव्हा तुम्ही हा फोटो किंवा व्हिडिओ पाहताच तुम्हाला त्या फोटोऐवजी Opened असा मॅसेज दिसेल आणि तो फोटो किंवा व्हिडिओ गायब होईल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*