डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना

गावांतील जन-जल-जंगल-जमीन या संसाधनांचा शाश्वत विकास साधून उत्पन्न / उत्पादकता, रोजगार संधी वाढविणे, मानव-वन्यजीव संघर्ष कमी करणे व संरक्षित क्षेत्रावरील मानवी दबाव कमी कारणे.

योजनेच्या प्रमुख अटी

  • बफर क्षेत्रातील गावे, राष्ट्रीय उदयान / अभयारण्याच्या सिमेपासून 2 कि.मी. चे आत येणा-या गावांचा समावेश योजनेत करावा.
  • या योजनेतंर्गत केलेल्या कामांचा तपशील तसेच प्रस्तावित कामांपुरता आरखडा तयार करणे.
  • गाव निवडताना गाव समूह तत्व अवलंब करणे.

आवश्यक कागदपत्रे

सूक्ष्म आराखडा.

लाभाचे स्वरूप असे

  1. गावातील महिला व युवकांना स्वयंरोजगाराविषयी प्रशिक्षण देणे, क्षमता बांधणी करणे व रोजगाराची संधी.
  2. उपलब्ध करून देणे, याकरीता औद्योगिक तज्ञांच व पर्यटन संस्थांचा सहभाग घेणे, गौण वनउपज संकलन, मुल्यवृध्दी व विक्रीस सहाय्य करणे.
  3. निसर्ग पर्यटन व गृह पर्यटनाचा विकास करणे, अनुषंगिक क्षमता बांधणी करणे, प्रशिक्षण देणे. पशु संसाधनांचा विकास, कृषि संसाधनांचा विकास, शौचालय, मैला प्रक्रिया.
  4. जल संसाधनांचा विकास.

या ठिकाणी संपर्क साधावा

संबंधित व्याघ्र प्रकल्पाचे वनक्षेत्रपाल.

📍 (टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

You might also like
Leave a comment