फीट आल्यावर प्रथम हे करा

फीट आली असं आपण बऱ्याच वेळा ऐकतो. स्नायूंवर पडलेल्या दबावामुळे फीट येण्याची शक्यता असते. यावेळी मेंदूकडे जाणाऱ्या संवेदना काही विशिष्ट काळासाठी खुंटतात. त्यामुळे मेंदूत अधिक कंपने दिसून येतात. यावेळी फीट येते.

फीट येण्याची लक्षणे

  1. चक्कर येणे, डोळ्यांपुढे अचानक अंधारी येणे.
  2. अचानक रक्तदाब वाढणे
  3. स्नायू अचानक घट्ट होणे किंवा कडक होणे
  4. चक्कर आल्यावर तोंडातून फेस येणे

फिट आल्यास असा करा उपचार

  1. फीट आलेल्या रूग्णाभोवती गर्दी करू नका.
  2. त्याला डोक्याखाली काहीतरी मऊ वस्तू द्या.
  3. फीट आल्यानंतर रूग्णाला लगेच पाणी देऊ नका, थोडा वेळ जाऊ द्या.
  4. जर रूग्णाचा श्वास थांबल्याचे लक्षात आलं तर लगेच डॉक्टरांकडे धाव घ्या.
  5. काही वेळा फीट ही थांबून पुन्हा पुन्हा येत असते अशावेळी रूग्णाला रूग्णालयात दाखल करा.

Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी.

You might also like
Leave a comment