सिंधू संस्कृति (हडप्पा संस्कृती)
हडप्पा संस्कृती ही जगातील प्राचीन ताम्र युगीन संस्कृतींपैकी एक आहे. हिचा कालखंड लिबी यांच्या कार्बन-१४ या शास्त्रीय पद्धतीनुसार इ.स.पूर्व २७०० ते इ.स.पूर्व १५०० असा मानला जातो. इ.स. १९२० च्या सुमारास लाहोर-मुलतान रेल्वे मार्गाचे काम सुरू असताना काही प्राचीन विटांचे अवशेष सापडले. यामुळे पुरातत्त्व खात्याने याचा शोध घेण्यासाठी सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन सुरू केले आणि एक प्राचीन संस्कृती प्रकाशात आली.
या संस्कृतीचे प्रथम अवशेष हडप्पा येथे सापडले म्हणून नव्यानेच शोधलेल्या या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे म्हणतात. ही संस्कृती प्रामुख्याने सिंधू नदीच्या प्रदेशात केंद्रित असल्याने तिला ‘सिंधू संस्कृती‘ असेही म्हणतात.
उत्खननात हडप्पा व मोहनजोदडो या दोन्ही नगरांच्या ठिकाणी एकाच प्रकारच्या मुद्रा आढळून आल्या. अशाच प्रकारच्या संस्कृतीचे अवशेष पश्चिम भारतात कालीबंगन, धोळावीरा, सुरकोटडा, लोथल, दायमाबाद इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात सापडले.
भारतातील ताम्रपाषाणयुगीन संस्कृती. सिंधूसंस्कृतीच्या अस्तित्वाचा पुरावा दयाराम सहानी यांनी १९२१ मध्ये उजेडात आणला. त्याच वर्षी पंजाबातील हडप्पा येथे प्रायोगिक उत्खननझाले, त्यात सिंधू संस्कृतीचे ताम्रपाषाणयुगीन स्वरुप स्पष्ट झाले. राखालदास बॅनर्जी यांनी मोहेंजोदडोचा शोध लावला (१९२२). यानंतर या दोन्ही स्थळी सर जॉन मार्शल, इ. J H मॅके, माधोस्वरुप वत्स, सर मॉर्टिमर व्हीलर इ. संशोधकांनी विस्तृत उत्खनने केली.
याशिवाय सर्वेक्षणातील पाहणीत सिंध-पंजाबात(विद्यमान पाकिस्तान) सिंधू संस्कृतीची अनेक प्राचीन स्थळे उजेडातआली. सिंधूचे खोरे हेच या ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे आगार असल्यानेतिला सिंधू संस्कृती अथवा हडप्पा संस्कृती असे नाव देण्यात आले.
त्यानंतरच्या उत्खनन-संशोधनांत या संस्कृतीच्या व्याप्तीबद्दलच्याकल्पनांत आमूलाग्र बदल झालेले आहेत. प्रारंभी पंजाबात रुपड पासून ते पश्चिमेस बलुचिस्तानातील सुक्तगेनडोर एवढ्या विभागातया संस्कृतीच्या अवशेषांची लहानमोठी सु. ६० व दक्षिणेस पश्चिमकिनाऱ्यालगत सौराष्ट्रात सु. ४० स्थळे ज्ञात झाली होती. मात्र आजमितीला सिंधू संस्कृतीच्या दोन हजारांहून अधिक स्थळांचा शोध लागलाआहे. त्यांपैकी सु. १५०० भारतात आणि सु. ५०० पाकिस्तानात आहेत.
विशेष म्हणजे त्यातील बहुसंख्य सहाशेहून अधिक हरयाणा राजस्थानमधील सरस्वतीच्या (सांप्रत घग्गर) खोऱ्यात आहेत. गुजरातेत लोथल व त्याच्या दक्षिणेस भगतराव येथेही सिंधू संस्कृतीचे लोकराहत असत, शिवाय राजस्थानात कालिबंगा, गिलुंड व इतर अनेकठिकाणी तसेच उत्तर प्रदेशात मीरतच्या पश्चिमेस सु. ३१ किमी. वर अलमगीरपूर येथे सिंधू संस्कृतीचे लोक राहत असत, असे आढळूनआले आहे. भगतराव मोहेंजोदडो पासून आग्नेयीस सु. ८०५ किमी. वर आहे.
सुक्तगेनडोर कराचीपासून पश्चिमेस सु. ४८३ किमी.वर आहेआणि अलमगीरपूर मोहेंजोदडोच्या पूर्वेस सु. ९६६ किमी. वर आहे.हरयाणा आणि पंजाबात बनवाली, मिताथल या स्थळांशिवाय सिंधमध्येयारी या ठिकाणी सिंधू संस्कृतिसदृश अवशेष मिळाले. यावरुन सिंधूसंस्कृतीची व्याप्ती किती विस्तृत होती, याची कल्पना येते.