महायनायकाने घेतली अवयवदान करण्याची शपथ
मुंबई : सुपरस्टार अमिताभ बच्चन मोठा निर्णय घेत ऑर्गन डोनेट घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर माहिती दिली. अमिताभ बच्चन यांनी एक ट्विट केले. ज्यामध्ये त्यांनी स्वत:चा एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यात त्यांच्या कोटवर एक लहान हिरव्या रंगाची रिबन दिसत आहे. हा फोटो शेअर करताना अमिताभ यांनी लिहिले की, ‘मी ऑर्गन डोनर होण्याची शपथ घेतली आहे. यासाठी मी हिरवी रिबन लावली आहे.’
T 3675 – I am a pledged ORGAN DONOR .. I wear the green ribbon of its sanctity !!🙏 pic.twitter.com/EIxUJzkGU6
— Amitabh Bachchan (@SrBachchan) September 29, 2020
अमिताभ यांनी ही पोस्ट शेअर केल्यानंतर त्यावर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. अनेकांनी अवयव दानाची शपथ घेतल्याचा स्वत:चा अनुभव शेअर केला आहे, तर काहींनी त्यांचे सर्टिफिकेट देखील शेअर केले आहे. तर काहींनी बच्चन यांच्यापासून प्रेरित होत ऑर्गन डोनर बनण्याचा निश्चय केला आहे.
कृषी कायदा लागू करण्याचा आदेश ठाकरे सरकारकडून मागे