म्हणून काकडीचे आवर्जून सेवन कराच!

सर्व ऋतुत काकडी सहज उपलब्ध होते. काकडी खाण्याने शरीराला पाणी आणि थंडावा मिळतो. याच्या बियांचाही आपल्याला खूप फायदा होतो.

काकडी खाण्याचे फायदे पुढीलप्रमाणे

  1. अपचन, उलटी, मळमळ, पोट फुगल्यासारखं वाटणं यावर गुणकारी.
  2. पोटाला थंडावा मिळतो.
  3. जर भूक मंदावली असेल तर काकडीचे काप करून त्यावर पुदीना, काळं मीठ, लिंबाचा रस, मिरे, जिरेपूड घालून खा.
  4. डोळ्यांखाली काळी वर्तुळं आल्यास काकडीचे काप डोळ्यांवर ठेवा.
  5. चेहऱ्यावरील डाग/ काळवटपणा दूर करायचा असेल तर काकडीचा रस, लिंबाचा रस आणि दूध एकत्र करून चेहऱ्यावर मसाज करा
  6. चटका बसला असेल किंवा भाजले असेल त्यावर काकडीचा रस लावा.
  7. काकडी रोज खाल्ली तर पोट साफ होण्यास मदत होते.
  8. आम्लपित्त, गॅसेस, आंत्रव्रण (अल्सर) असे विकार असतील तर काकडीचा कीस किवा काकडीचा रस 2-4 तासांनी प्या.
  9. काकडीचा कीस चेहरा, मान यावर नियमितपणे लावला तर चेहऱ्यावरील मुरुम पुटकुळ्या, सुरकुत्या दूर होतात.
  10. काकडीचा रस केसांना लावला तर त्यात असणाऱ्या सिलिकॉन व गंधकामुळं केस गळायचे थांबतात.

काकडी कधी खाऊ नये?

  • हिवाळ्यात आणि पावसाळ्यात शक्यतो ककाडी प्रमाणात खा.
  • कफजन्य समस्या असतील तर काकडी खाऊ नये.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*