फटाके फोडताना अशी घ्या काळजी

दरवर्षी दिवाळी सण हा सर्वत्र मोठ्या उत्साहाच्या वातावरणात आणि जल्लोषात साजरा केला जातो. मात्र, मोठ्या उत्साहाच्या वातावरणात फटाके फोडताना आपण अनेकदा भान विसरून सणाचा मनमुराद आनंद लुटत असतो.

फटाके फोडताना आपल्या चुकांमुळे अनेक मोठ-मोठ्या दुर्घटना घडतात, अनेकांचे जीवनच धोक्यात येते. जीवित हानी टाळण्यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. दिवाळी सणाच्यावेळी फटाके फोडताना कोण-कोणती काळजी घ्यावी? याबाबत आपण समजून घेऊयात…

फटाके उडवितांना ‘ही’ घ्या काळजी :

  • गाड्यांची पार्किंगमध्ये फटाके उडवू नये.
  • विजेच्या डिपीजवळ फटाके उडवणं टाळावे.
  • शोभेचे, आसमंत उजळणारे फटाके वापरावेत.
  • सुरसुऱ्या, विझल्यानंतर त्या पाण्यात टाकाव्या.
  • फटाके मोकळ्या जागेत उडवावे.
  • फटाके उडवितांना सुती कपडे घालावे.
  • फटाके हातात घेऊन फोडू नये.
  • जळणाऱ्या फटाक्यांजवळ जाऊ नये.
  • फटाके खिशात ठेऊ नये.
  • जळणाऱ्या दिव्यापासून दूर ठेवा.
  • वाऱ्यामध्ये उडणारे फटाके फोडू नये.
  • दुर्घटनाग्रस्त व्यक्तीला तात्काळ डॉक्टरकडे न्यावे.
  • आग विझविण्यासाठी जाड पोत्याचा वापर करावा.

भाजल्यानंतर काय कराल?

  • भाजल्याच्या ठिकाणी पाण्याचा मारा करावा.
  • डोळ्यात धूर गेल्यास डोळे स्वच्छ पाण्याने धुवावे.
  • धुरामुळे त्रास होत असेल तर नाकाला फडके बांधा.

ज्या परिसरात आपण फटाके फोडणार आहोत तो परिसर फटाके फोडण्यासाठी बंदी असलेले क्षेत्र नाही याची खातरजमा करुन घ्यावी. त्यानंतरच आपण फटाके फोडण्यास परिसरात जावे.

You might also like
Leave a comment