काय आहे धनत्रयोदशीचं महत्त्व ? जाणून घ्या सविस्तर माहिती

दिवाळी हा वर्षभरात येणाऱ्या सणांपैकी एक महत्त्वाचा सण आणि त्यातही आपल्याकडे दिवाळीला विशेष महत्त्व आहे. याच पार्श्वभूमीवर आपण धनत्रयोदशीचं महत्त्व सविस्तर जाणून घेऊयात.

दीपावलीची सुरुवात धनत्रयोदशीपासून होते. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज असे सण या एकामागोमाग असतात. दिवाळीमध्ये धनत्रयोदशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

असं आहे धनत्रयोदशीचं महत्त्व

  • आपल्याकडे असलेल्या संपत्तीची या दिवशी पूजा केली जाते. आपल्याकडे असलेल्या धनलक्ष्मीबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. व्यापारी, सराफ आणि शेतकऱ्यांमध्ये या सणाला विशेष महत्त्व दिलं जातं.
  • कापणीचा हंगाम ओसरत असतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या खळ्यात धान्याच्या राशी असतात. तर दिवाळीच्या खरेदीसाठी व्यापाऱ्यांकडे गर्दी होते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी धान्य हे धन तर व्यापाऱ्यांकडे येणारं धन अशा दोन्ही अर्थानं या धनाची पूजा या दिवशी केली जाते.

काय आहे धनत्रयोदशी साजरी करण्याची प्रथा ?

  • धनत्रयोदशी साजरी करण्याची प्रथा ही धन्वंतरीच्या स्मृतीप्रत्यर्थ सुरू झाली असं सांगितलं जातं. या दिवशी नैवेद्य म्हणून धणे आणि गुळ ठेवला जातो. यासोबत गूळ, खोबरं, पुरणपोळी किंवा गोडधोड नैवेद्यही दाखवण्याची प्रथा आहे.
  • दारात असलेल्या धान्याची आणि घरात असलेल्या धनाची या दिवशी पूजा करून आरोग्य, उत्तम धन आणि संपदा लाभावी यासाठी प्रार्थना केली जाते. तर आयुर्वेदात या दिवशी धन्वंतरीची पुजा केली जाते.

या दिवशी या फुलांचे हार सजावटीसाठी वापरतात किंवा देवाला वाहिले जातात. रात्री पणत्याची रोषणाई करून घर आणि गावं उजळवली जातात. अनेक गावांमध्ये आजही दिव्यांपेक्षा पारंपरिक पद्धतीच्या पणत्यांना अधिक महत्त्व दिलं जातं.

You might also like
Leave a comment