दिवाळीला या भेटवस्तू देऊन आनंद द्विगुणीत करा

दिवाळीचा सण उत्साहात घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची सजावट आणि विविध प्रकारचं फराळ बनवला जातो. यामध्ये अजून एक गोष्ट दिवाळीमध्ये करतात, ती म्हणजे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत तसेच बायको आणि प्रेयसीला काहीतरी भेटवस्तू देत असतो. तर नेमकी कोणती भेटवस्तू द्यायची? हाच प्रश्न अनेकांना पडलेला असतो. तर आपण जाणून घेऊ काय भेटवस्तू देता येईल…

मास्क

अलीकडच्या काळात आपण कोरोना विषाणूशी लढा देत असून सध्या सर्वात उपयुक्त अशी भेटवस्तू मास्क आहे. आपण विविध वेगवेगळ्या प्रकारचे डिजाईन, कलरमधील मास्क दिवाळी भेटवस्तू म्हणून देऊ शकता.

साडी

तुम्हाला जर बायकोला भेटवस्तू द्यायची असेल तर ट्रेंडमध्ये असलेल्या साड्या भेटवस्तू म्हणून द्या. या साड्या सावरायला सोप्या आणि दिसायलाही मॉर्डन असतात.

ऑक्सडाइज ज्वेलरी

सध्या महिलांसाठी खास ऑक्सडाइज ज्वेलरीची फॅशन सुरु असून जर आपल्याला महिलांसाठी काही भेटवस्तू घ्यायची असल्यास तुम्ही हा पर्याय नक्की करू शकता.

चॉकलेट्स

लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच चॉकलेट्स आवडतात त्यामुळे तुम्हाला गिफ्ट घेण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही है पर्याय निवडू शकता.

ड्रायफ्रूट्स

जर आपणांस ज्येष्ठ किंवा वयस्कर माणसांना भेटवस्तू द्यायचे असेल तर त्यांना गोड गोष्टी द्यायच्या नसतील तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे ड्रायफ्रूट्स भेट म्हणून देऊ शकता.

ब्यूटी बॉक्स

आपल्याला जर बायको किंवा प्रेयसीसाठी काही भेटवस्तू द्यायची असेल तर आपण ब्यूटी बॉक्स त्यांना भेटवस्तू म्हणून देऊ शकता. त्यांना तोच ब्यूटी बॉक्स तुम्ही देऊ शकता की जो त्या आधी वापरत असतील. कारण त्यांच्या त्वचेला सवय झालेली असेल व अॅलर्जीही होणार नाही.

परफ्यूम

ज्वेलरीचं किंवा मेकअपच्या विविध वस्तूंचं स्रियांना आकर्षण असते. त्यामुळे बायको किंवा प्रेयसीला आपण एखाद्या छानश्या चहुबाजूने दरवळणाऱ्या परफ्यूचा सेट आपण भेटवस्तू म्हणून देऊ शकता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*