डोळ्यांसाठी लेझर कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरताय? सावधान!
चष्म्याचा वापर टाळण्यासाठी चष्म्याला एक उत्तम पर्याय म्हणून अनेकांकडून डोळ्यांसाठी लेझर कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरल्या जातात.
तसेच फॅशन आणि ट्रेंड म्हणून देखील कलर लेन्सेस वापरल्या जातात. मात्र लेन्सेस वापरत असताना काळजी घेणे गरजेचे आहे.
कारण लेन्सेस वापरत असताना काही धोके देखील असतात. यासाठी लेन्स लावल्यानंतर काळजी घ्यावी.
लेन्स लावल्यानंतर लेन्स डोळ्यांवर ठेवून झोपू नका: जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा डोळे कोरडे पडतात डोळ्यांना ऑक्सिजन कमी पडतो अशावेळी लेन्सचा कोरियाला संसर्ग होऊ शकतो.
चांगल्या दर्जाचे कॉन्टॅक्ट लेन्स सोल्युशन सोबत स्वच्छ बोटाने साफ करा, पाण्याचा वापर करू नका, लेन्स केसमधील सोल्युशन दररोज बदला,
दर महिन्याला सोल्युशन ची बाटली बदला, लेन्स केस बदला, सहामाही ऐवजी मासिक डिस्पोजेबल लेन्सेस वापरा लेन्स व केस खाली पडल्यास टाकून द्या, पोहताना लेन्सचा वापर करू नका, तसेच लेन्सचा अतिरिक्त वापर टाळा.