मालवणी कोलंबी मसाला

🍽️ साहित्य

२०-२२ मध्यम आकाराच्या कोलंब्या

वाटणासाठी-

१ मध्यम कांदा उभा चिरून

१/२ कप किसलेलं सुकं खोबरं

४-५ लवंगा

१” दालचिनी तुकडा

२ वेलदोडे

१ टीस्पून बडीशेप

१ १/२ टीस्पून धने

२ लसूण पाकळ्या

ग्रेवीसाठी-

१/२ कप बारीक चिरलेला कांदा

१/२ टीस्पून हळद

१ १/४ टीस्पून लाल तिखट

२-३ सोलं (आमसुलं )

मीठ चवीप्रमाणे

४ टेबलस्पून तेल

कृती

  1. कोलंबीचा धागा आणि कवच काढून साफ करून घ्या.
  2. दोन टेबलस्पून तेलात वाटणासाठीचा कांदा, लसूण,लवंगा,वेलदोडे,दालचिनी,धने आणि बडीशेप ; कांदा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या. नंतर त्यात सुकं खोबरं घालून खोबरं; तांबूस होईपर्यंत खरपूस भाजून घ्या. भाजलेलं सगळं जिन्नस मिक्सरमध्ये १/२ कप गरम पाणी घालून एकदम बारीक वाटून घ्या.
  3. पातेल्यात तेल गरम करा आणि बारीक चिरलेला कांदा २-३ मिनिटे परतून घ्या. नंतर हळद ,तिखट आणि वाटण घालून २-३ मिनिटे परता. कोलंबी घालून परता.
  4. मीठ घालून ढवळा. झाकण ठेवून कोलंबी व्यवस्थित शिजवा. कोलंबी शिजल्यावर सोलं घालून १ उकळी काढा.
  5. ५-१० मिनिटे वाफ मुरु द्या. नंतर कोथिंबीर पेरून सोलकढी आणि भाताबरोबर किंवा पोळी बरोबर सर्व्ह करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*