
उन्हाळा संपताना आणि पावसाळ्याच्या तोंडावर रानमेवा असलेल्या जांभूळ फळाचे आगमन होते. जीभ आणि तोंडही जांभळे करणारी जांभळे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच आवडतात.जांभळाचे अनेक आरोग्यदायी फायदे असतात. जांभळामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, क जीवनसत्त्व अधिक तर किंचित प्रमाणात ब जीवनसत्त्व असते.त्याचबरोबर प्रथिने, खनिजे, तंतूमय व पिष्टमय पदार्थ व थोडया प्रमाणात मेद असतो. त्याचबरोबर कोलीन व फोलिक आम्लही त्यामध्ये असते. जांभळाच्या कोवळ्या पानात ई जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आहे.जांभूळ हे बी मधुमेह या आजारावर अत्यंत गुणकारी आहे. लोहतत्त्व जास्त प्रमाणात असल्यामुळे याच्या सेवनामुळे रक्त शुद्ध व लाल होते.पोटदुखी, अपचन, अशुद्ध ढेकर येणे जांभूळ गुणकारी ठरते त्याचबरोबर यकृताची कार्यक्षमता वाढवून रोग प्रतिकारक शक्ती वाढते.आम्लपित्त अरुची, दात व हिरडया कमकुवत असतील रक्त येत असेल, पोटात येणारा मुरडा व अतिसार तर यावर जांभूळ गुणकारी ठरते.
Leave a Reply