घरच्या घरी बनवा सुगंधी उटणं

आजकाल घाईगडबडीच्या दिवसांत अनेकजण बाजारातून विकतची उटणं घेऊन येतात. परंतू त्यात भेसळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे यंदा बाजारातून विकतचे उटणं आणण्यापेक्षा घरीच करून पहा. त्यासाठी लागणारे साहित्य उत्तम आयुर्वेदिक भंडारातून विकत घ्या…

साहित्य

गव्हला कचरा, चंदन पावडर, आंबेहळद, दारू हळद, आहारातील साधी हळद, नागरमोथा, मुलतानी माती, गुलाबपावडर, वाळा पावडर.

कृती

तिन्ही प्रकारची हळद प्रत्येकी एक चमचा एकत्र करा. यामध्ये गव्हला कचरा, चंदन पावडर, नागरमोथा, मुलतानी माती, गुलाबपावडर, वाळा पावडर एकत्र करा. तुम्हाला किती सुगंधी करायची आहे, त्यानुसार चंदन पावडर आणि गुलाब पावडर मिसळा. हे मिश्रण आयत्या वेळेस खोबरेल दूध आणि कोमट पाण्यामध्ये मिसळू शकता.

  • टीप : पावडर अगदी बारीक असावी. अन्यथा त्याचा त्वचेला त्रास होऊ शकतो

दिवाळी खरेदी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*