असे बनवा मालपुआ | मालपुआ रेसिपी
साहित्य
- १ कप कणिक,
- दुध ५० ग्रॅम,
- सुंठ आणि वेलची पावडर,
- गुळ
- तूप
कृती
- एका भांड्यात कणिक, किसून घेतलेला गुळ, सुंठ – वेलचीची पावडर आणि दुध यांचे मिश्रण एकजीव होईपर्यंत ढवळावे.
- कणकेच्या आणि गुळाच्या गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
- त्यानंतर नॉन स्टिक तव्यावर तूप घालून हे मिश्रण डोशासारखे टाकावे, मग गरम गरम मालपोहे खाण्यासाठी तयार असतील.