बहिष्कृत हितकारिणी सभा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भारतातील अस्पृश्यांचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दर्जा उंचाविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 9 मार्च 1924 रोजी मुंबईतील परळ येथील दामोदर सभागृहात अस्पृश्यांप्रती कनवळा असलेल्या आणि त्यासाठी कार्य करण्याची तयारी असणाऱ्यांची सभा आयोजीत केली.

या बैठकीला चिमनलाल हरीलाल सेटलवाड, रॅगलर परांजपे, बाळासाहेब खेर, रूस्तुमजी जिनवाला यांसारखे मान्यवर उपस्थित होते.

ब्राम्हणेतर चळवळीचे पुढारी दिनकरराव जवळकरे आणि केशवराव जेथे यांनी या सभेसाठी एक निवेदन सादर केले होते, “जर सभेत एकही ब्राह्मण नसेल तरच आम्ही सहभागी होईल’. यावर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढील प्रतिक्रियो दिली. बहिष्कृत हितकारिणी सभा ब्राह्मण जातीच्या विरुद्ध नसून ब्राह्मण्यबादाच्या विरुद्ध आहे.

या सभेत झालेल्या गहण चर्चेनंतर 20 जुलै 1924 रोजी मुंबई, परळ येथील दामोदर सभागृहात बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना झाली.

बहिष्कृत हितकरिणी सभेचे ब्रीदवाक्य

शिकवा, चेतवा व संघटित करा

Educate, Organize and Agitate

बहिष्कृत हितकरिणी सभा

बहिष्कृत हितकरिणी सभेचा उद्देश्य / हेतु

  1. बहिष्कृत समाजात शिक्षणाचा प्रसार करणे तसेच वसतिगृहाची निर्मिती करणे व त्यांना
    रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे.
  2. बहिष्कृत अभ्यास वर्गाची निर्मिती करून सांस्कृतिक चळवळ उभारणे
  3. या वर्गाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी औद्योगीक आणि कृषी शाळांची निर्मिती करणे.
  4. बहिष्कृत वर्गाच्या समस्यांचे प्रतिनिधित्व करून ते सरकारपुढे मांडणे.

बहिष्कृत हितकरिणी सभेची कार्यकारिणी

अध्यक्ष
चिमणलाल हरीलाल सेटलवाड
उपाध्यक्ष
मेयर निस्सीम, रूस्तुमजी जिनवाला
सॉलिसिटर
जी. के. नरीमन, आर. पी. परांजपे, व्ही. पी. चव्हाण, बाळासाहेब खेर
कार्याध्यक्ष
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सेक्रेटरी
एस. एन. शिवतरकर
खजीनदारएन. टी. जाधव

बहिष्कृत हितकरिणी सभा

बहिष्कृत हितकरिणी सभेच्या वतीने अस्पृश्यांच्या कल्याणासाठी शाळा, वसतिगृह व ग्रंथालये
सुरू करण्यात आले.

सभेच्या वतीने सोलापूर येथे 4 जानेवारी 1925 रोजी एक वसतिगृह सुरू करून दलितं, गरीब
विद्यार्थ्यांना निवास, भोजन, कपडे व शैक्षणिक, साधनसामग्री पुरवली गेली. या वसतिगृहाच्या
देखभालीची जबाबदारी बाबासाहेबांनी श्री. जिवाप्पा सुभा आयदळे यांच्यावर सोपविली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या वसतिगृहास सोलापूर नगरपालिकेकडून रू 40000 चे
अनुदान मिळवून दिले तसेच “सरस्वती विलास” नावाचे मासिक व एक मोफत वाचनालयही सुरू
केले.

सभेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक 3 एप्रिल 1927 रोजी बहिष्कृत भारत हे
पाक्षिक सुरू केले. या पाक्षिकाचे संपादक स्वत: बाबासाहेब आंबेडकर होते. पाक्षिकात
बातम्यांपेक्षा ‘अग्रलेख” प्रसिद्ध होत.

बहिष्कृत भारत च्या दुसऱ्या अंकापासून संत ज्ञानेधर महाराजांच्या ओव्या उद्धृत केल्या जात.

बहिष्कृत हितकारिणी सभेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन कमिशन कडे एक पत्र
सादर केले व त्यात त्यांनी मागासवर्गीयांसाठी नामनिर्देशन तत्त्वावर जागा आरक्षित
ठेवण्यासंबंधीची मागणी केली. याशिवाय भूदल, नौदल व पोलीस खात्यात मागासवर्गीयांची
भरती करण्यासंबंधीचीही मागणी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारिणी सभा, कुलाबा शाखेच्या वतीने महाड येथे
चवदार तळे सत्याग्रह केला. या सत्याग्रहात अस्पृश्य समाजाबरोबर सवर्ण समाज मोठ्याप्रमाणात
सहभागी झाला होता.

बहिष्कृत हितकरिणी सभेच्या द्वारे सुरभा नाना टिपणीस, भाई अनंतराव चित्रे, गो. नी. उर्फ
बापूसाहेब सहस्त्रबुद्धे, देवराम नाईक यांसारख्या अनेक सवर्ण समाजाचे सहकारी बाबासाहेबांच्या
सामाजिक कार्यास लाभले परंतु या सवर्ण समाजाच्या लोकांना आपल्या जात बांधवांकडून
सामाजिक रोषास सामोरे जावे लागले.

यावर उपाय म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी, सवर्ण कार्यकर्त्यांस मानव मुक्तीचे काम करता यावे
यासाठी दिनांक 4 सप्टेंबर 1927 रोजी “समता समाज संघा‘ ची स्थापना केली.

न्यायालयीन पुनर्विलोकन या संकल्पनेचा उगम कोणत्या देशात झाला

न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या तत्त्वाचा उगम व विकास अमेरिकेमध्ये झाला.
Leave a comment