किसान सन्मान निधी योजना अंतर्गत महिन्याला ३००० रुपये मिळणार

कोरोना संक्रमण काळात सामान्य लोकांसह, नोकरदार, उद्योजकांना मोठे नुकसान झाले आहे. याची भरपाई करण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत आहे. यामध्ये शेतकरी देखील काही वेगळ्या परिस्थितीत नाही. शेतमालाला उठाव नाही, दर नाही त्यात वाढलेली महागाई, औषधे आदी गोष्टी असतानाच सर्वत्र पूराचे संकट आलेले आहे. यामुळे पिके वाया गेली आहेत.

शेतकरी शेतात राब राब राबून कमी पैसे घेऊन लोकांचे पोट भरत असतो. त्याच्या हाती आयुष्याच्या संध्याकाळी काहीच राहत नाही. अशा शेतकऱ्यांच्या म्हातारपणीची सोय केंद्र सरकारने केली आहे. यासाठी तुम्ही शेतकरी असाल तर एक काम करावे लागणार आहे.

जर तुम्ही किसान सन्मान निधीचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. तुम्हाला या योजनेचा मोठा फायदा होऊ शकतो. किसान मानधन योजनेनुसार सरकारद्वारे तुमच्या खात्यात महिन्याला ३००० रुपये येणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल, चला जाणून घेऊया.

भारत सरकारच्या या योजनेचा लाभ त्याच शेतकऱ्यांना होणार आहे, जे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत. यासाठी तुमचे वय हे १८ ते ४० च्या आतमध्ये असायला हवे. या योजनेतून ६० वर्षांच्या शेतकऱ्यांना दर महिन्याला पेन्शन दिली जाते.

छोट्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी केंद्राची ही योजना आहे. या योजनेनुसार ६० वर्षांवरील शेतकऱ्यांच्या खात्यात महिन्याला ३००० रुपये पाठविले जातात. ही रक्कम किसान सन्मान निधी योजनेपेक्षा वेगळी आहे. तिथे २००० रुपये पाठविले जातात.

जर तुम्ही शेतकरी आहात आणि जर तुमचे वय १८ ते ४० वर्षे मध्ये असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊन भविष्याची तरतूद करू शकता. त्यासाठी आणखी एक अट म्हणजे तुमच्याकडे २ हेक्टरपेक्षा कमी जमीन असायला हवी. तेव्हाच तुम्हाला ६० वर्षांनंतर या योजनेचा लाभ मिळू शकेल.

यासाठी तुम्हाला दर महिन्याला केवळ ५५ रुपये या योजनेत जमा करावे लागतील. जोवर तुमचे वय ६० वर्षे होत नाही तोवर तुम्हाला हे पैसे भरावे लागणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. यामध्ये आधार कार्ड, ओळख पत्र, वयाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, शेतीचा सातबारा, बँक खात्याचे पासबुक, मोबाईल नंबर आणि पासपोर्ट साईज फोटो लागेल.

ही सर्व कागदपत्रे घेऊन त्याची झेरॉक्स काढून तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या जन सेवा केंद्रामध्ये जावे लागणार आहे. तिथे तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. यानंतर तुम्ही या योजनेत सहभागी होऊ शकता.

You might also like
Leave a comment