
इलायची, वेलदोडा, एला, विलायची या नावाने परिचित असणारा वेलची हा एक सुगंधी मसाला आहे. स्वादाने परिपूर्ण असणाऱ्या वेलचीमध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत.
- वेलचीचा उपयोग माऊथ फ्रेशनर म्हणून केला जातो.
- वेलचीमध्ये लोह, व्हिटॅमिन सी, जीवनसत्व ब गटातील एक महत्वाचा घटक आहे. लाल रक्त पेशी निर्मितीत एक महत्वाची भूमिका वेलची बजावते.
- वेलचीने गॅसची समस्या दूर होते. तसेच पचनासाठी मदत करते.
- पोट फुगले किंवा जळजळ होत असल्यास वेलची यातून सुटका करते.
- वेलची, आल्याचा तुकडा, लवंग आणि धणे वाटून त्याची पावडर गरम पाण्याबरोबर घेतल्याने पचनाबाबतच्या समस्या दूर होतात.
Leave a Reply