डाॅ. आंबेडकर आणि घटना समित्या

डाॅ. आंबेडकर १ समितीचे अध्यक्ष तर एकुण १० समित्यांचे सदस्य होते. सर्वाधिक समित्यांचा सदस्य असलेले ते एकमेव व्यक्ती होते.

२९ आॅगस्ट १९४७ रोजी स्थापन केलेल्या मसुदा समितीचे(Drafting committee) ते अध्यक्ष होते.

डाॅ. आंबेडकर १० समित्यांचे ते सदस्य होते

  1. ध्वज समिती
  2. मुलभूत हक्क उपसमिती
  3. अल्पसंख्यांक उपसमिती
  4. संघ राज्य घटना समिती
  5. घटना सुधारणा उपसमिती
  6. नागरिकत्व तदर्थ समिती
  7.  सर्वोच्च न्यायालय तदर्थ समिती
  8. सल्लागार समिती
  9. पुर्व पंजाब आणि बंगालच्या अल्पसंख्यांकांच्या समस्येवरील उपसमिती
  10. संविधान सभा कार्य समिती(Functions committee)

जलै १९४६ च्या घटना सभात्याग निवडणुकीत आंबेडकर बंगाल मधील “जेस्सोर आणि खुलना” या मतदार संघातून निवडुन आले होते.”जोगेंद्र नाथ मंडल” यांनी यासाठी या जागेचा राजीनामा दिला होता.

दशाची फाळणी झाल्यावर हा भाग पाकिस्तान मध्ये गेला. त्यावेळी आंबेडकरांनी त्या जागेचा राजीनामा दिला.

मात्र नंतर आंबेडकर “बाँम्बे प्रांतातुन” घटना सभेवर पुन्हा निवडुन आले. यावेळी बॅ. “एम. आर. जयकर” यांनी राजीनामा दिला होता.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*