मुळा वाढवतो प्रतिकारशक्ती

आपले आरोग्य किती महत्वाचे आहे हे आपल्याला या वर्षाने दाखवून दिले आहे. आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे.

या वर्षात आपण प्रतिकारशक्ती हा शब्द जितक्या वेळा ऐकला असेल तेवढा कधीच ऐकला नाही.

हीच प्रतिकारशक्ती नीट राहावी म्हणून काय काय करता येऊ शकते? तर आपला आहार आणि विहार व्यवस्थित असणे यासाठी गरजेचे असते. मुळा आहारात समाविष्ट करून घेतल्याने हीच प्रतिकारशक्ती होऊ शकते बळकट! आणखी काही उपयुक्त फायदे जाणून घेऊयात!

मुळा शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्याचे काम करतो. वास्तविक यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळंत, जे आपल्याला हिवाळ्यात होणाऱ्या सर्दी पडसं यापासून वाचण्यात मदत करतं.

मुळ्याच्या सेवनाने हृदय रोगाच्या धोका कमी होतो. वास्तविक हे अँथोसायनिनचा चांगला स्रोत आहे. तज्ञांचा असा विश्वास आहे की, हृदयरोगाचे प्रमाण मुळ्याच्या सेवनाने कमी होते.

मुळ्याचं सेवन केल्यानं पचन तंत्र व्यवस्थित ठेवण्यास देखील मदत मिळते. हे ऍसिडिटी पासून, गॅसचा त्रास आणि मळमळ यासारख्या समस्यांना सुधारण्यास देखील उपयुक्त आहे.

लठ्ठपणा आपल्यापसून दूर ठेवायचा असेल तर मुळा रोज खाणे गरजेचे असते. मधुमेही देखील याचे सेवन करू शकतात. यात असणारे गुणधर्म रक्तातील साखर शोषून घेण्यात फायदेशीर आहेत.

(हा लेख माहितीपर आहे. प्रत्येकाचे शरीर वेगळे असल्याने, आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच प्रत्येकाने आपला आहार ठरवावा!)

You might also like
Leave a comment