लहान मुलांमधील ताप आणि घ्यायची काळजी
लहान मुलांमधील ताप काळजी करायला लावणारा असतो. परंतु अंगाला हात लावून जाणवत जरी असला तरी प्रत्यक्षपणे थर्मामीटरवर मोजणे गरजेचे आहे. हल्ली तर इलेक्ट्रॉनिक थर्मामीटरवर प्रत्यक्षात ताप अंकामध्ये दिसत असल्याने ताप मोजणे सोपे झाले आहे आहे.
मुलाला ताप असेल तर डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी ताप किती वाजता व किती आला होता, कोणते औषध दिले, ताप किती वेळात उतरला या सर्व गाष्टींची नोंद एका कागदावर करून ठेवावी. जेणेकरून डॉक्टरांनाही उपचार करणे सोपे होते. ताप मोजण्यापूर्वी थर्मामीटरचा पारा 98 अंश एफच्या खाली उतरवा. काखेत ताप मोजण्यापूर्वी तो भाग घामविरहित पुसून ठेवा.
ताप कमी करण्यासाठी हे करा
- खुल्या हवेचा वापर.
- शरीरावरील कपडे ढिले करून मोकळे करावेत.
- शरीर ओल्या कपड्याने पुसून काढावेत.
- डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तापाचे औषध द्यावीत.
ताप आल्यास हे करू नका
- बाळाला स्वेटर, चादर, रगमध्ये गुंडाळू नये.
- नळाखाली थंड पाण्याचे आंघोळ घालू नये.
Disclaimer* : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी.