ग्रामपंचायत बद्दल संपूर्ण माहिती

कायदा – १९५८ (मुंबई ग्रामपंचायत अधिनियम) कलम ५ मध्ये प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. परंतु एखाद्या गावामध्ये ६०० पेक्षा कमी लोकसंख्या असेल त्याठिकाणी गट ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची सभासद संख्या :

लोकसंख्यासभासद
६०० ते १५००७ सभासद
१५०१ ते ३०००९ सभासद
३००१ ते ४५००११ सभासद
४५०१ ते ६०००१३ सभासद
६००१ ते ७५००१५ सभासद
७५०१ त्यापेक्षा जास्त१७ सभासद

ग्रामपंचायत निवडणूक

 • प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्य निवडणूक आयोग घेते.
 • कार्यकाल – ५ वर्ष
 • विसर्जन – कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी राज्यसरकार विसर्जित करू शकते.

ग्रामपंचायत आरक्षण :

 • महिलांना – ५०%
 • अनुसूचीत जाती/जमाती – लोकसंख्येच्या प्रमाणात.इतर मागासवर्ग – २७% (महिला ५०%)

ग्रामपंचायतीच्या सभासदांची पात्रता

 1. तो भारताचा नागरिक असावा.
 2. त्याला २१ वर्ष पूर्ण झालेली असावीत.
 3. त्याचे गावच्या मतदान यादीत नाव असावे.

ग्रामपंचायतीचे विसर्जन

विसर्जित झाल्यापासून सहा महिन्याच्या आत निवडणूक घेणे बंधनकारक आहे तिच्या राहिलेल्या कालावधीसाठी पुढे काम करणे.

सरपंच व उपसरपंच यांची निवड :

निवडून आलेल्या सदस्यांमधूनच ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेच्या वेळी केले जाते.

सरपंच व उपसरपंचाचा कार्यकाल

५ वर्ष इतका असतो परंतु त्यापूर्वी ते आपला राजीनामा देतात.

ग्रामपंचायत सदस्य राजीनामा

 1. सरपंच – पंचायत समितीच्या सभापतीकडे देतो
 2. उपसरपंच – सरपंचाकडे

ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी वाद निर्माण झाल्यास

सरपंच-उपसरपंचाची निवड झाल्यापासून १५ दिवसांच्या आत जिल्हाधिकार्‍याकडे तक्रार करावी लागते व त्यांनी दिलेल्या निर्णयानंतर त्याविरोधी १५ दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे तक्रार करावी लागते.

ग्रामपंचायत अविश्वासाचा ठराव

सरपंच आणि उपसरपंचाची निवड झाल्यापासून ६ महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही व तो फेटाळला गेल्यास पुन्हा त्या तारखेपासून १ वर्षापर्यंत मांडता येत नाही.

ग्रामपंचायत बैठक

एका वर्षात १२ बैठका होतात (म्हणजे प्रत्येक महिन्याला एक)

ग्रामपंचायत अध्यक्ष

सरपंच असतो नसेल तर उपसरपंच

तपासणी

कमीत कमी विस्तारात अधिक दर्जाच्या व्यक्तीकडून तपासणी केली जाते.

ग्रामपंचायत अंदाजपत्रक

सरपंच तयार करतो व त्याला मान्यता पंचायत समितीची घ्यावी लागते

ग्रामपंचायतची आर्थिक तपासणी

लोकल फंड विभागाकडून केली जाते.

ग्रामसेवक / सचिव

निवड

जिल्हा निवडमंडळाकडून केली जाते.

नेमणू

मुख्य कार्यकारी अधिकारी.

नजीकचे नियंत्रण

गट विकास अधिकारी.

कर्मचारी

ग्रामविकास खात्याचा वर्ग-३ चा.

ग्रामसेवक कामे

 • ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करतो
 • ग्रामपंचायतीचे दफ्तर सांभाळणे.
 • कर्मचार्‍यांवर नियंत्रण ठेवण
 • ग्रामपंचायतीचा अहवाल पंचायत समिती व जिल्हा परिषदेला देणे
 • व्हिलेज फंड सांभाळणे.
 • ग्रामसभेचा सचिव म्हणून काम पाहणे.
 • ग्रामपंचातीच्याबैठकांना हजर राहणे व इतिबृत्तांत लिहणे.
 • गाव पातळीवर बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम करणे
 • जन्म-मृत्यूची नोंद करणे.

ग्रामसभा

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार निर्मिती करण्यात आली आहे.

ग्रामसभा संपूर्ण महिती

बैठक

आर्थिक वर्षात (२६ जानेवारी, १५ ऑगस्ट, २ ऑक्टोंबर)

सभासद

गावातील सर्व प्रौढ मतदार यांचा समावेश होता.

अध्यक्ष

सरपंच नसेल तर उपसरपंच

गणपूर्ती

एकूण मतदारांच्या १५% सभासद किंवा एकूण १०० व्यक्तींपैकी जी संख्या कमी असेल.
_________________________

ग्रामपंचायतींची कार्य

१. कृषी – जमीन सुधारणा, धान्य कोठारांची निर्मिती, कंपोष्ट खात निर्मिती, सुधारित बियाणांचा वापर, सुधारित शेती प्रोत्साहन.

२. पशु संवर्धन – पशुधनाची काळजी, संकरीत गुराच्या पैदाशीसाठी प्रयत्न करणे, दुग्धोत्पादन वाढविणे, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करणे.

३. समाजकल्याण – दारूबंदीस प्रोत्साहन, जुगार आणि अस्पृश्यता नष्ट करणे, महिला/बालकल्याणाच्या योजना लाभार्थींपर्यंत पोहोचविणे.

४. शिक्षण – प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षणाची सोय करणे, गावाचा शैक्षणिक विकास.

५. आरोग्य – सार्वजनिक विहीर, गटारे आणि परिसर स्वच्छ राखणे, शासकीय योजना राबविणे, शुद्ध जल पुरवठा.

६. रस्ते बांधणी – रस्ते, पूल, साकव यांची बांधकामे करणे, सार्वजनिक बाग, क्रीडांगणे, सचिवालय बंधने.

७. ग्रामोद्योग आणि सहकार – स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे, कार्यकारी संस्था/पतपेढ्या स्थापणे.

८. प्रशासन – महसुलाची कागदपत्रे अद्ययावत करणे, सार्वजनिक मालमत्तेची नोंद ठेवणे, घरांची नोंद ठेवणे, जन्म, मृत्यू आणि विवाहाची नोंद ठेवणे, बक्षिसांची नोंद, अतिक्रमणे हटविणे.
___________________________

आपणास आवश्‍यक असलेली माहिती कोणत्या नोंदवहीत असते याबाबत ही माहिती

 • गाव नमुना नंबर – १ – या नोंदवहीमध्ये भूमी अभिलेख खात्याकडून आकारबंध केलेला असतो, ज्यामध्ये जमिनीचे गट नंबर, सर्व्हे नंबर दर्शविलेले असतात व जमिनीचा आकार (ऍसेसमेंट) बाबतती माहिती असते
 • गाव नमुना नंबर – १ अ – या नोंदवहीमध्ये वन जमिनीची माहिती मिळते. गावातील वन विभागातील गट कोणते हे समजते. तशी नोंद या वहीत असते.
 • गाव नमुना नंबर – १ ब – या नोंदवहीमध्ये सरकारच्या मालकीच्या जमिनीची माहिती मिळत.
 • गाव नमुना नंबर – १ क – या नोंदवहीमध्ये कुळ कायदा, पुनर्वसन कायदा, सिलिंग कायद्यानुसार भोगवटादार यांना दिलेल्या जमिनी याबाबतची माहिती असते. सातबाराच्या उताऱ्यामध्ये नवीन शर्त असल्यास जमीन कोणत्या ना कोणत्या तरी पुनर्वसन कायद्याखाली किंवा वतनाखाली मिळालेली जमीन आहे असे ठरविता येते.
 • गाव नमुना नंबर – १ ड – या नोंदवहीमध्ये कुळवहिवाट कायदा अथवा सिलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमिनी, त्यांचे सर्व्हे नंबर व गट नंबर याबाबतची माहिती मिळते.
 • गाव नमुना नंबर – १ इ – या नोंदवहीमध्ये गावातील जमिनींवरील अतिक्रमण व त्याबाबतची कार्यवाही ही माहिती मिळते.
 • गाव नमुना नंबर – २ – या नोंदवहीमध्ये गावातील सर्व बिनशेती (अकृषिक) जमिनींची माहिती मिळते.
 • गाव नमुना नंबर – ३ – या नोंदवहीत दुमला जमिनींची नोंद मिळते. म्हणजेच देवस्थाना साठीची नोंद पाहता येते.
 • गाव नमुना नंबर – ४ – या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीचा महसूल, वसुली, विलंब शुल्क याबाबतची माहिती मिळते.
 • गाव नमुना नंबर – ५ – या नोंदवहीत गावाचे एकूण क्षेत्रफळ, गावाचा महसूल, जिल्हा परिषदेचे कर याबाबतची माहिती मिळते.
 • गाव नमुना नंबर – ६ – (हक्काचे पत्रक किंवा फेरफार) या नोंदवहीमध्ये जमिनीच्या व्यवहारांची माहिती, तसेच खरेदीची रक्कम, तारीख व कोणत्या नोंदणी कार्यालयात दस्त झाला याची माहिती मिळते.
 • गाव नमुना नंबर – ६ अ – या नोंदवहीमध्ये फेरफारास (म्युटेशन) हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार व चौकशी अधिकाऱ्यांचा निर्णय याबाबतची माहिती मिळते.
 • गाव नमुना नंबर – ६ क – या नोंदवहीमध्ये वारस नोंदीची माहिती मिळते.
 • गाव नमुना नंबर – ६ ड – या नोंदवहीमध्ये जमिनीचे पोटहिस्से, तसेच वाटणी किंवा भूमी संपादन याबाबतची माहिती मिळते
 • गाव नमुना नंबर – ७ – (७/१२ उतारा) या नोंदवहीमध्ये जमीन मालकाचे नाव, क्षेत्र, सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर, गट नंबर, पोट खराबा, आकार, इतर बाबतीची माहिती मिळते.
 • गाव नमुना नंबर – ७ अ – या नोंदवहीमध्ये कुळ वहिवाटीबाबतची माहिती मिळते. उदा. कुळाचे नाव, आकारलेला कर व खंड याबाबतची माहिती मिळते
 • गाव नमुना नंबर – ८ अ – या नोंद वहीत जमिनीची नोंद, सर्व्हे नंबर, आपल्या नावावरील क्षेत्र व इतर माहिती मिळते
 • गाव नमुना नंबर – ८ ब, क व ड – या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या महसूल वसुलीची माहिती म
 • गाव नमुना नंबर – ९ अ – या नोंदवहीत शासनाला दिलेल्या पावत्यांची माहिती मिळते
 • गाव नमुना नंबर – १० – या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या जमा झालेल्या महसुलाची माहिती मिळते
 • गाव नमुना नंबर – ११ – या नोंदवहीत प्रत्येक गटामध्ये सर्व्हे नंबर, पीकपाणी व झाडांची माहिती मिळते.
 • गाव नमुना नंबर – १२ व १५ – या नोंदवहीमध्ये पिकाखालील क्षेत्र, पडीक क्षेत्र, पाण्याची व्यवस्था व इतर बाबतीची माहिती मिळत
 • गाव नमुना नंबर – १३ – या नोंदवहीमध्ये गावाची लोकसंख्या व गावातील जनावरे याबाबतची माहिती मिळते.
 • गाव नमुना नंबर – १४ – या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणीपुरवठ्याबाबतची माहिती, तसेच वापरली जाणारी साधने याबाबतची माहिती मिळते.
 • गाव नमुना नंबर – १६ – या नोंदवहीमध्ये माहिती पुस्तके, शासकीय आदेश व नवीन नियमावली याबाबतची माहिती मिळते
 • गाव नमुना नंबर – १७ – या नोंदवहीमध्ये महसूल आकारणी याबाबतची माहिती मिळते
 • गाव नमुना नंबर – १८ – या नोंदवहीमध्ये सर्कल ऑफिस, मंडल अधिकारी यांच्या पत्रव्यवहाराची माहिती असते.
 • गाव नमुना नंबर – १९ – या नोंदवहीमध्ये सरकारी मालमत्तेबाबतची माहिती मिळते
 • गाव नमुना नंबर – २० – पोस्ट तिकिटांची नोंद याबाबतची माहिती मिळते.
 • गाव नमुना नंबर – २१ – या नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.

अशा प्रकारे तलाठी कार्यालयात सामान्य नागरिकांना गाव कामगार तलाठी यांच्याकडून वरील माहिती विचारणा केल्यास मिळू शकते. आपणास आपल्या मिळकतीबाबत व गावाच्या मिळकतीबाबत माहिती मिळाल्यामुळे मिळकतीच्या मालकी व वहिवाटीसंबंधीचे वाद कमी होण्यास व मिटण्यास मदत होऊ शकते असे वाटते.

You might also like
Show Comments (1)