
आपली परंपरा, आपली संस्कृती आपल्याला वयाने, कर्तृत्त्वाने मोठ्या असलेल्या व्यक्तींना वाकून नमस्कार करावयास शिकवते. चरणस्पर्श करण्याच्या या रीतीमागेदेखील काही आरोग्यदायी रहस्य देखील लपलेली आहेत. त्यावर एक नजर…
- स्वतःमध्ये आलेला ‘अहं’भाव आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्ती पुढे झुकल्याने कमी होतो.
- कंबरेत वाकून खाली वाकणे म्हणजेच ‘पदहस्तासन.’ हे एक योगासन असून यामुळे शरीराचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
- पायांच्या बोटांपासून मेंदूपर्यंत होणारा रक्तप्रवाह सुधारतो.
- पोटाजवळील स्नायूंवर दाब आल्याने पचनाचे विकारही दूर राहतात.
- कमरेपासून सारे शरीर खाली झुकल्याने रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते परिणामी चेहर्यावरील कांती सुधारते.
- प्रामुख्याने लहान मुलांनी नियमित या आसनाचा सराव केल्यास त्यांची उंची वाढण्यास मदत होते.
- शरीरातील रक्तप्रवाह सुधारल्याने डोकेदुखी व निद्रानाशाची समस्या कमी होते.
- सकारात्मकता वाढते.
म्हणूनच तुमच्यापेक्षा कर्तृत्त्वाने, वयाने मोठ्या असणार्या व्यक्तींना वाकून नमस्कार करा. कारण याने तोटा नाही मात्र तुमचा फायदा नक्की होणार!
Leave a Reply