जो बायडेन अमेरिकेचे अध्यक्ष झाल्याचा भारताला काय फायदा होणार?

अमेरिकेत नुकतीच राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक झाली. भारत व अमेरिका यांच्यातील भागीदारी ही 21 व्या शतकास आकार देणारी ठरेल, दोन्ही देशातील संबंध आणखी मजबूत केले जातील, असे संकेत अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी दिले आहेत.

काय म्हणाले होते बायडेन?

  • बायडेन हे जेव्हा भारतात आले होते तेव्हा त्यांनी दोन्ही देशातील द्विपक्षीय व्यापार 500 अब्ज डॉलर्सवर नेण्याचे उद्दिष्ट स्पष्ट केले होते. सध्या दोन्ही देशातील व्यापार 150 अब्ज डॉलर्सचा आहे.
  • डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचाराच्या वेळी भारतातील हवा वाईट असल्याचे वक्तव्य खोडत ‘हवामान बदलाचे प्रश्न आपणच सोडवायचे आहेत’, असे म्हटले आहे.
  • बायडेन यांनी असेही म्हटले आहे, की कमला हॅरिस व मी दोघांनाही भारताशी भागीदारी महत्त्वाची वाटते. दोन्ही देशातील मैत्रीच्या संबंधांना मध्यवर्ती स्थान देण्याचा आम्ही प्रयत्न करू.

“पंधरा वर्षांंपूर्वी मी आम्ही भारताशी ऐतिहासिक अणुकरार केला होता. भारत व अमेरिका जवळ आले तर जग सुरक्षित होईल. बराक ओबामा यांच्या काळात भारत व अमेरिका यांच्यातील संबंध सर्वात चांगले होते”, असे बायडेन यांनी म्हटले आहे.

Leave a comment