दीपिकासोबत उपस्थित राहण्यासाठी रणवीरची विनंती

मुंबई | ड्रग्सप्रकरणी चौकशीसाठी एनसीबीनं अभिनेत्री दीपिकाला समन्स बजावल्यानंतर ती चौकशीसाठी पती रणवीरसह गोव्याहून मुंबईमध्ये दाखल झाली आहे.

दीपिकाची २६ सप्टेंबर म्हणजेच उद्या एनसीबीकडून चौकशी होणार आहे. या चौकशीपूर्वीच अभिनेता रणवीर सिंहने चौकशीदरम्यान दीपिकासोबत उपस्थित राहण्यासाठी एनसीबीकडे विनंती केली आहे. कधीकधी दीपिकाला घाबरल्यामुळे पॅनिक अटॅक येतात. त्यामुळे आपल्याला चौकशीदरम्यान उपस्थित राहु द्यावं, अशी मागणी त्यानं एनसीबीकडे केली आहे.

You might also like
Leave a comment