‘हे’ आहेत उपवासाचे फायदे!

गेल्या काही दिवसांपासून नवरात्रीचे उपवास सुरु आहेत. या उपवासांचा कालावधी सर्वात मोठा असतो. अशात हे उपवास आरोग्यासाठी कसे फायदेशीर असतात? ते पाहूयात…

डिटॉक्स करण्यात मदत

उपवासात ताजे आणि ऋतूला धरून पदार्थ खाल्ले जातात. तसेच ऊर्जादायी अन् पचायला हलके पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरातील विषद्रव्यं बाहेर टाकली जातात.

पचनक्रिया मदत

पचनास हलक्या पदार्थांचा समावेश केल्याने पचनक्रिया सुधारते.

अ‍ॅसिडिटी किंवा अपचन दूर

आहारातील पदार्थांची निवड योग्य केली तरच नक्की फायदा झालेला दिसतो.

वजन कमी करण्यास मदत

उपवासात कमी तसेच सात्विक खाण्याकडे कल असल्याने जास्तीचे वजन सहज कमी होते.

मानसिक स्वास्थ्य

सात्विक आहारामुळे आपले शरीर आणि मन दोन्ही प्रसन्न होते. तसेच शरीरात ऊर्जा टिकून राहते.

You might also like
Leave a comment