IPO म्हणजे काय ? Initial Public Offer सकंल्पना

जेव्हा तुम्ही वर्तमातपत्र वाचता, तेव्हा कंपन्यांनी ऑफर केलेल्या IPO (आयपीओ) च्या घोषणा तुमच्या नजरेखालून जातात. पण IPO म्हणजे काय असा प्रश्‍न पडणार्‍यांपेंकी तुम्ही एक असाल तर तुमच्यासाठी खास माहिती येथे देण्यात आली आहे.

जेव्हा एखादा उद्योग सर्वप्रथम भाग (Shares) प्रसृत करतो आणि गुंतवणुकदार हे भाग विकत घेतात तेव्हा त्या बाजाराला प्राथमिक बाजार असे म्हणतात.

हा उद्योग नव्याने स्थापन झालेल्या आणि नव्याने भांडवलाची गरज (New Issues Market) असलेला असू शकतो, असा उद्योग करत असलेल्या शेअरविक्रीला Initial Public Offerring (IPO) असे म्हणतात.

प्राथमिक बाजारानंतर शेअर्सची खरेदी-विक्री एक गुंतवणूकदार ते दुसरा गुंतवणूकदार अशी होऊ लागते या बाजाराला दुय्यम बाजार असे म्हणतात.

IPO अंतर्गत, असूचीबद्ध कंपनी (Unlisted Company) आपले नवीन Issues off Securities किंवा अस्तित्वात असलेले रोखे पहिल्यांदा जनतेसमोर सादर करते.

IPO द्वारेच असूचीबद्ध कंपनी Stock Exchange च्या सूचीबद्ध यादीमध्ये जागा मिळवते. हा पर्याय सामान्यतः नवीन आणि मध्यम आकाराच्या Firms द्वारे वापरला जातो जो आपला व्यवसाय वाढविण्यासाठी आणि विस्तृत करण्यासाठी निधीच्या शोधात असतो

IPO मध्ये गुंतवणूक करावी का?

नवीन कंपत्यांच्या IPO मध्ये पैशाची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेणे खरच कठिण आहे. मात्र जोखिम स्वीकारणे शेअर बाजारात एक सकारात्मक स्वभाव समजला जातो.

Leave a comment