एका ओळीत सारांश, 15 जानेवारी 2021

दिनविशेष 15 जानेवारी

भारतात भुदल / लष्कर दिन – 15 जानेवारी.

संरक्षण

  • केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत या संस्थेने तयार केलेल्या स्वदेशी 73 ‘LCA तेजस Mk-1A’ लढाऊ विमाने (देशात अभिकल्पित केलेले, अत्याधुनिक 4+ पिढीचे वजनाने हलके लढाऊ विमान) आणि 10 ‘LCA तेजस Mk-1’ प्रशिक्षण विमानांच्या खरेदी प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली – हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (HAL).
  • भारतीय सशस्त्र दलांचा पाचवा माजी सैनिक दिन – 14 जानेवारी 2021.
  • ‘1971 युद्ध’च्या वेळी शूर सैनिकांच्या पराक्रमाचा गौरव करणारे ‘स्वर्णिम विजय वर्ष’ गाण्याचे लेखक – कुमार विश्वास (संगीतकार: ख्रिस पॉवेल आणि गायक: मिस्टर रोमी).
  • —– यांनी “सम्मान” मासिक आणि भारतीय हवाई दलाने “वायु संवेदना” मासिक प्रकाशित केले, जे केवळ माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी समर्पित आहे – भारतीय भुदल.

अर्थव्यवस्था

ऑनलाईन मंच आणि मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्स यांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या डिजिटल कर्ज सेवा विकसित करण्यासाठी आणि त्यांचे नियमन करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने नेमलेल्या सहा सदस्यांच्या कार्य गटाचे अध्यक्ष – जयंत कुमार दाश.

राष्ट्रीय

  • 2020-2021 च्या योजनेच्या कालावधीसह प्रधानमंत्री कौशल विकास योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचा (PMKVY 3.0) प्रारंभ 15 जानेवारी 2021 रोजी देशभरातल्या सर्व राज्यांमधल्या निवडक ____ जिल्ह्यांमध्ये केला गेला – 600.
  • भारतातले पहिले राज्य, जिथे उच्च माध्यमिक स्तरावरील अभ्यासक्रमात ‘गंगा संवर्धन आणि जल प्रदूषण निर्मूलन’ हा विषय शिकविला जाणार आहे – उत्तरप्रदेश.
  • कोविड-19 महामारीच्या काळात खासगी शाळांना ऑनलाईन निधी पुरविणारे देशातले पहिले राज्य – छत्तीसगड.

क्रिडा

  • ‘खेलो इंडिया आइस हॉकी स्पर्धा 2021’ यांचे आयोजन स्थळ – चिकटना, कारगिल, लडाख.

राज्य विशेष

  • महाराष्ट्र मानवी हक्क आयोगाचे नवनियुक्त सचिव – तुकाराम मुंढे.

ज्ञान-विज्ञान

  • या संस्थेने भारताची पहिली स्वदेशी ‘ASMI’ मशीन पिस्तूल तयार केली – संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO).
  • राष्ट्रीय माहितीशास्त्र केंद्र (NIC) आणि _ या संस्थांनी संयुक्तपणे ‘CollabCAD’ सॉफ्टवेअरचे अनावरण केले – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE).

सामान्य ज्ञान

  • कौशल्य भारत अभियानाचा प्रारंभ – 15 जुलै 2015.
  • भारतीय सशस्त्र दलांचे पहिले सेनापती (Commander-in-Chief) – के. एम. करियप्पा.
  • “राज्याच्या विधानमंडळाची घटना” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 168.
  • “राज्याची विधानपरिषद रद्द करणे किंवा तयार करणे” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 169.
  • “विधानसभेचे सभापती आणि उपसभापती” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 178.
  • “विधानपरिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 182.
  • “राज्य विधानसभेचे सचिवालय” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 187
You might also like
Leave a comment