इंडिया जस्टिस रिपोर्ट २०२०

इंडिया जस्टिस रिपोर्ट २०२० ची दुसरी आवृत्ती नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अहवालात देशभरातील राज्यांचे पोलीस , न्यायव्यवस्था , कारागृह , कायदेशीर साहाय्य या ४ यंत्रणांच्या स्थितीचे मूल्यमापन करण्यात आले आहे.

कायदेशीर साहाय्य करण्यात महाराष्ट्र ६.९० गुणांसह प्रथम क्रमांकावर आहे.

महाराष्ट्राला १० पैकी ५.७७ पॉईंट्स मिळाले , मागच्या वर्षी महाराष्ट्राला ५.९२ पॉईंट्स मिळाले होते.

एक कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या मोठय़ा व मध्यम आकाराच्या १८ राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे.

पोलीस व्यवस्थेत कर्नाटक , न्यायव्यवस्थेत तमिळनाडू तर कारागृह व्यवस्थेत राजस्थान प्रथम क्रमांकावर आहेत.

पोलीस व्यवस्थेत मध्यप्रदेश , न्यायव्यवस्थेत बिहार तर कारागृह व्यवस्थेत झारखंड शेवटच्या क्रमांकावर आहेत

पोलीस व्यवस्थेत महाराष्ट्राचे १३वे , न्यायव्यवस्थेत ५वे आणि कारागृह व्यवस्थेत ४थे स्थान आहे.

तसेच सात छोटय़ा राज्यांच्या यादीत ४.५७ गुणांसह त्रिपुराने प्रथम क्रमांक पटकावला आहे .

इंडिया जस्टिस रिपोर्ट २०२० क्रमवारी

 1. महाराष्ट्र : ५.७७ गुण
 2. तमिळनाडू : ५.७३ गुण
 3. तेलंगणा : ५.६४ गुण
 4. पंजाब : ५.४१ गुण
 5. केरळ : ५.३६ गुण
 6. गुजरात : ५.१७ गुण
 7. छत्तीसगड : ५.१४ गुण
 8. झारखंड : ५.१२ गुण
 9. हरयाणा : ४.९४ गुण
 10. राजस्थान : ४.९३ गुण
 11. ओडिशा : ४.९० गुण
 12. आंध्रप्रदेश : ४.८१ गुण
 13. बिहार : ४.६५ गुण
 14. कर्नाटक : ४.५९ गुण
 15. उत्तराखंड : ४.४८ गुण
 16. मध्यप्रदेश : ४.३९ गुण
 17. पश्र्चिम बंगाल : ३.८९ गुण
 18. उत्तरप्रदेश : ३.१५ गुण

इंडिया जस्टिस रिपोर्ट २०२० नुसार कायदेशीर साहाय्य करण्यात सर्वोत्तम असणारी पहिली १० राज्य

 1. महाराष्ट्र : ६.९० गुण
 2. बिहार : ६.५७ गुण
 3. पंजाब : ६.३५ गुण
 4. झारखंड : ६.१८ गुण
 5. हरियाणा : ६.०७ गुण
 6. तेलंगणा : ५.९३ गुण
 7. केरळ : ५.८४ गुण
 8. ओडिशा : ५.६४ गुण
 9. गुजरात : ५.३९ गुण
 10. उत्तराखंड : ५.२५ गुण

शेवटचे स्थान : उत्तरप्रदेश

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*