बुलढाण्यातील लोणार सरोवर आणि आग्रा येथील केथमलेक सरोवराला मिळाला ‘रामसर’ पाणथळ स्थळाचा दर्जा.

बुलडाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध लोणार सरोवराला ‘रामसर’ पाणथळ स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे.

जगातील जैवविविधतेने महत्त्वपूर्ण असलेल्या पाणथळ जागांना आंतरराष्ट्रीय ‘रामसर’ स्थळाचा दर्जा देण्यात येतो.

लोणार अभयारण्य हे महाराष्टातून घोषित झालेले दुसरे ‘रामसर’ स्थळ आहे.

इराणमधील रामसर शहरात २ फेब्रुवारी १९७१ रोजी पाणथळ संवर्धन करण्याबाबतचा ठराव झाला होता.

१९७५ पासून याची अंमलबजावणी सुरू झाली. भारताने १९८२ पासून पाणथळ स्थळांचे संवर्धन स्वीकारले आहे.

आतापर्यंत जगात २२०० पाणथळ स्थळ असल्याची नोंद आहे.

‘रामसर’ संकेस्थळावर ११ नाेव्हेंबर २०२० रोजी घोषित करण्यात आलेल्या पाणथळ स्थळाच्या यादीत भारतातील दोन स्थळांचा समावेश आहे.

यात उत्तर प्रदेशातील आग्रा येथील केथमलेक सरोवर आणि महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराचा समावेश आहे.

हल्ली लोणार खाऱ्या पाण्याचे तळे हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असून, त्याचे नियंत्रण त्यांच्याचकडे आहे.

लोणार सरोवर उल्कापातामुळे तयार झाले असून उल्कापातामुळे तयार झालेले हे जगातील ३ रे मोठे सरोवर आहे.

You might also like
Leave a comment