व्हिटॅमिनयुक्त असावा मुलांचा आहार
लहानग्यांच्या आहारात व्हिटॅमिनयुक्त पदार्थांचा समावेश असेल तर त्याने त्यांची प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत होते. यासाठी त्यांच्या सक्रिय राहण्यासाठी आहारात विशेषतः कोणत्या पदार्थांचा समावेश करायला हवा? याचा विचार करूयात…
व्हिटॅमिन बी 6
मुलांच्या आहारात व्हिटॅमिन बी 6 समृद्ध पदार्थ समाविष्ट करा. कारण याच्या अभावामुळे शरीरात आळस येतो. व्हिटॅमिन बी 6 रोगप्रतिकारक पेशी तयार करतात. केळी, मासे यात व्हिटॅमिनयुक्त बी 6 भरपूर असते.
लिंबूवर्गीय फळं
मुलांच्या जेवणामध्ये तुम्ही लिंबूवर्गीय फळं जसे संत्री, आवळा समाविष्ट करा.
व्हिटॅमिन ई
शरीराचे विषारी पदार्थांपासून संरक्षण करण्यासाठी मुलांच्या आहारामध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्सयुक्त पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. व्हिटॅमिन ई अवाकाडो, बदाम, सूर्यफूल बियाणे इ. मध्ये भरपूर प्रमाणात आढळते.
व्हिटॅमिन डी
हे मुलांची हाडे मजबूत करण्यासाठी आवश्यक आहे, कारण हे कॅल्शियमचे शोषण्यास मदत करते. याच्या कमतरतेमुळे मुलास शरीरात थकवा जाणवू शकतो. वाढीस बाधा येऊ शकते. त्यामुळे आहारात व्हिटॅमिन डी समृद्ध दुग्ध उत्पादने, अंडी आणि मासे आदीचा समावेश करा.