आमच्या सर्वांची ‘माँ’ , आशाताई आम्हाला पोरकं करून गेल्या-सुबोध भावे

मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेकांनी दुःख व्यक्त केलं आहे. प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे याने देखील फेसबुकवर एक भावुक पोस्ट करत लॉकडाऊन आधी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या भेटीचा फोटो पोस्ट केला आहे. सुबोध भावे लिहितात, “प्रदीर्घ काळ स्वतःच्या अभिनयाने संगीत रंगभूमी,चित्रपट आणि मालिका या सर्वच ठिकाणी लीलया काम करणारी आमच्या सर्वांची ‘माँ’ , आशाताई आम्हाला पोरकं करून गेल्या. आशाताई तुला भावपूर्ण श्रद्धांजली! मित्रांनो कृपया काळजी घ्या” असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
वाबगावकर यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर त्यांना साताऱ्यातील प्रतिभा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ऑक्सिजनची पातळी खालावल्याने त्यांचे पहाटे ४.३० च्या सुमारास निधन झाले आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. आशालता वाबगावकर यांनी आतापर्यंत मराठी आणि हिंदी अशा जवळपास १०० चित्रपटांमध्ये काम केलं आहे
सोनी मराठी चॅनेलवर नुकत्याच सुरु झालेल्या ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेत त्यांची भूमिका असून साताऱ्यात शूटिंग सुरु असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. या मालिकेतील २७ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यात १६ कलाकार आणि इतर क्रू मेंबर्सचा समावेश आहे. राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आल्यानंतर शूटिंगला परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता शूटिंग दरम्यान कलाकारांना कोरोनाची लागण होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
सकल मराठा समाजाच्या वतीने आमदार बबनराव शिंदे यांना निवेदन