‘तुमसे मिलने की तमन्ना; अभिनेता सलमान खान ट्विट

मुंबई – सुप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांची करोनाची चाचणी करण्यात आली होती. बालसुब्रमण्यम यांचा अहवाल निगेटिव्ह आला असून त्यांची प्रकृती पुन्हा खालावली आहे. यासंदर्भातील माहिती त्यांचा मुलगा एस.पी. चरण यांनी दिली आहे.

बालसुब्रमण्यम यांचा अहवाल निगेटिव्ह आला मात्र, अद्यापही त्यांची प्रकृती नाजूक आहे. त्यामुळे सध्या ते लाइफ सपोर्टवर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. त्यांच्या प्रकृतीसाठी सर्वांकडूनच प्रार्थना करण्यात येत आहेत.

बॉलिवूडचा अभिनेता सलमान खान यानंदेखील त्यांची प्रकृती लवकरात लवकर उत्तम व्हावी यासाठी प्रार्थना केली आहे. दरम्यान, बालसुब्रमण्यम यांनी सलमानसाठी ‘तुमसे मिलने की तमन्ना है’, ‘पहला पहला प्यार है’, ‘दिल दीवाना’ आणि ‘साथिया तू ने ये क्या किया’ यांसारखी अनेक गाणी गायली होती.

You might also like
Leave a comment