निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण

मुंबई : ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेत आसावरीची भूमिका साकारणा-या अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना कोणतीच लक्षणे जाणवत नसल्याने सध्या त्या घरीच क्वारंटाइनमध्ये आहेत. निवेदिता यांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने मालिकेची शूटिंग थांबवण्यात आली आहे.‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेत भूमिका साकारणा-या इतर कलाकारांचीही कोरोना चाचणी करण्यात आली. तेजश्री प्रधान, आशुतोष पत्की, गिरीश ओक या सर्वांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. १५ सप्टेंबरपासून मालिकेची शूटिंग थांबवण्यात आली. मात्र, दोन दिवसांत शूटिंग सुरू होईल. निवेदिता सराफ क्वारंटाइनमधून बाहेर आल्यानंतर उपस्थित राहतील, असे सांगण्यात आले.

You might also like
Leave a comment