सुशांत केस तेव्हा मागे पडली जेव्हा कंगनाने पोलीस आणि सरकारला टार्गेट केलं -रेणुका शहाणे

एकमत ऑनलाईन

मुंबई । सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युनंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी यावर आपापली मते मांडत आहेत अभिनेत्री रेणुका शहाणे सुद्धा या मुद्द्यावरून सोशल मीडियावर आपलं मत व्यक्त करत राहिली आहे. आता त्यांनी भावना व्यक्त केली की, आता जे काही वाद-विवाद सुरू आहेत आणि जे काही घडत आहे त्याचा सुशांत केससोबत काहीही संबंध नाही. यावरून रेणुका शहाणे यांनी कंगना रणौतवर टिका केली आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, एका वेबसाइटशी बोलताना रेणुका शहाणे म्हणाल्या की, सुशांत केस तेव्हा मागे पडली जेव्हा कंगना रणौतने मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारला टार्गेट करणं सुरू केलं होतं. आणि कंगनाने मुंबईची तुलना पीओकेसोबत केली होती. त्या म्हणाल्या की, हे सगळे मुद्दे सुशांत केसशी संबंधित नाहीत. सुशांतच्या मुद्द्यावर कंगनाचीही पहिली प्रतिक्रिया हीच होती की, हे सगळं नेपोटिज्मच्या कारणाने झालं.

रेणुका शहाणे यांनी कंगनाने उर्मिला मातोंडकरवर केलेल्या वक्तव्यावरही टिका केली. कंगनाने उर्मिला मातोंडकरला सॉफ्ट पॉर्न स्टार म्हटलं होतं. यावर रेणुका शहाणे म्हणाल्या की, कंगनाने शालीनतेची सीमा पार केली आहे आणि ती या सर्व बेकार गोष्टी तिच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर बोलत आहे. रेणुका असंही म्हणाल्या की, त्यांना कंगनाकडून कोणत्याही संवेदनशीलतेची अपेक्षा राहिलेली नाही.

रेणूका शहाणेने ट्विट केले होते की

रेणूका शहाणेने ट्विट केले होते की, जरी मला कंगनाचे मुंबईला पाकव्याप्त काश्मीरशी तुलना करणारे वक्तव्य रुचले नाही. तरीही सूडभावनेने पालिकेने केलेल्या उद्धवस्तेमुळे मी अस्वस्थ झाले आहे. तुम्हाला इतक्या खालच्या स्तरावर जाण्याची गरज नाही. @CMOMaharashtra कृपया यामध्ये हस्तक्षेप करा. आपण सर्वजण महारोगराईचा सामना करत आहोत. आता या अनावश्यक नाटकाची गरज आहे का?’.

‘झुंड’ सिनेमाच्या प्रदर्शनावर तेलंगणा उच्च न्यायालयाने आणली स्थगिती

You might also like
Leave a comment