कुली नंबर 1 चं पोस्टर प्रदर्शित

बॉलिवूड स्टार वरुण धवन आणि सारा अली खान सध्या त्यांचा आगामी सिनेमा कुली नंबर 1 मुळं चर्चेत आहेत.

हा सिनेमा अ‍ॅमेझॉन प्राईम वर ख्रिसमस डे ला म्हणजेच 25 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.

आज वरुणनं त्याच्या इंस्टावरून याचं एक पोस्टर शेअर केलं आहे.

त्यानं ट्रेलरची माहिती देताना सांगितलं आहे की, 28 नोव्हेंबर रोजी सिनेमाचा ट्रेलर रिलीज होणार आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदा वरुण धवन आणि सारा अली खान ही जोडी एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे.

हे दोघं मुख्य भूमिकेत झळकणार असून त्यांची धम्माल केमिस्ट्री प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

Leave a comment