पबजीची पुन्हा रिएन्ट्री! भारतासाठी खास गेम असणार

पबजी मोबाईल भारतात परत येणार आहे. दक्षिण कोरियन कंपनी पबजी कॉर्पोरेशननं यासंदर्भात घोषणा केली आहे.

भारतीय बाजाराचा विचार करून नवा गेम घेऊन येत असल्याची माहिती कंपनीनं दिली आहे.

भारतात पुन्हा येणाऱ्या पबजीमध्ये चिनी कंपनीची कोणतीही भागिदारी नसणार असल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, भारतात पबजी मोबाईल इंडिया लॉन्च करण्यात येणार असल्याची माहिती पबजी कॉर्पोरेशननं दिली.

Leave a comment