तेलगू अभिनेते जयप्रकाश रेड्डी यांचे निधन

प्रसिद्ध तेलुगू अभिनेते जयप्रकाश रेड्डी यांचे आंध्र प्रदेशातील गुंतूर याठिकाणी निधन झाले आहे.

हृदयविकाराच्या झटक्याने जयप्रकाश यांचे निधन झाले ते 74 वर्षांचे होते.

आंध्र प्रदेशचे तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू यांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

‘जयप्रकाश रेड्डी यांच्या जाण्याने तेलुगू सिनेमा आणि थिएटरने आज एक हिरा गमावला आहे.

मी त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या दु:खात सहभागी आहे.’, असे ट्विट करत चंद्राबाबू यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

Leave a comment