शेतकऱ्यांना दिलासा, केंद्राकडून खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ

केंद्र सरकारने पुन्हा एकदा खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी याबाबत माहिती देताना म्हटलं की, भातवरील किमान आधारभूत किंमतीमध्ये 72 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

त्यानंतर1868 रुपये प्रतिक्विंटलपासून भात आता प्रतिक्विंटल 1940 रुपये झाला आहे. यासह बाजरीवरील किमान आधारभूत किंमत प्रति क्विंटल 2150 रुपयांवरून 2250 रुपये प्रतिक्विंटलवर करण्यात आली आहे.

कृषीमंत्री पुढे म्हणाले की, गेल्या 7 वर्षात शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकेल यासाठी मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

किमान आधारभूत किंमत 2018 पासून किंमतीवर 50 टक्के परतावा जोडून घोषित केली जाते. चालू खरीप विपणन हंगामासाठी (KMS) 2020-21 (6 जून 2021 पर्यंत) गेल्या वर्षीच्या 736.36 LMT च्या तुलनेत किमान आधारभूत किंमतीवर LMT पेक्षा जास्त धान्य खरेदी केले गेले, ज्यामुळे शेतकर्‍यांना यांचा फायदा झाला आहे.

कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात एकामागून एक कृषी क्षेत्रात मोठे निर्णय घेण्यात आले, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले. शेतीला फायदेशीर व्यवसाय करण्यासाठी काम केले गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*