IPL 2020 : दिल्ली पहिल्यांदाच अंतिम फेरीत

IPL 2020 चा दुसरा क्वॉलिफायर सामना अबु धाबीत रविवारी (8 नोव्हेंबर) झाला.

हा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात झाला.

या सामन्यात दिल्लीने हैदराबादला पराभवाची धूळ चाखत 17 धावांनी विजय मिळवला.

आणि या विजयाबाबरोबरच दिल्ली कॅपिटल्सचा संघ पहिल्यांदाच आयपीएलच्या फायनलमध्ये पोहचला आहे.

आता मंगळवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात दिल्लीकरांना मुंबई इंडियन्सच्या तगड्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.

दरम्यान प्रथम फलंदाजी करताना 3 बाद 189 धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारल्यानंतर दिल्लीने हैदराबादला 8 बाद 172 धावांवर रोखले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.