20 वर्षीय देवदत्त पडिक्कलने केली धमाकेदार एन्ट्री

IPLच्या १३व्या हंगामातील तिसरा सामना आज सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर बेंलगोर संघात होत आहे.

सनरायझर्स हैद्राबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने नाणेफेक जिंकत या सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यात 20 वर्षीय देवदत्त पडिक्कलने पदार्पण केले. त्याने 42 चेंडूंचा सामना करताना 8 चौकारांच्या मदतीने तडाखेबंद 56 धावा केल्या.

कोण आहे देवदत्त पड्डिकल ?

20 वर्षीय डावखुरा फलंदाज देवदत्त पड्डिकल कर्नाटककडून डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खेळतो.

गेल्या वर्षी सय्यद मुश्ताक अली टी -20 ट्रॉफीतून टी -20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होते.

देवदत्तच्या नावे 12 टी-20 सामन्यांमध्ये 175.75 च्या स्ट्राइक रेटने 580 धावा आहेत.

2019-20 मध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये देवदत्तने 11 डावांमध्ये 609 धावा केल्या.

ज्यामध्ये दोन शतके आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*